मुंबई(सुधीर घाग) : सातवी डिग्री ब्लॅक बेल्ट मिळवणारे व भारताचे पहिले नॅशनल कोच आणि आंतरराष्ट्रीय पंच रवींद्र वामनराव पाटील जुडो फेडरेशन ऑफ इंडिया च्या पंच संचालक पदी निवड झाल्याचे पत्र प्रशासकीय जुडो फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने ओ एस डी मा. राजन सि एस. यांनी नुकतेच जाहीर केले.
रवींद्र वामनराव पाटील यांच्या या निवडी बद्दल मुंबई आणि महाराष्ट्र ज्युडो असोसिएशन तर्फे अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. रवींद्र वामनराव पाटील हे पोदार कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स माटुंगा च्या आवारात गेली 50 वर्ष पोदार ज्युडो क्लब च्या मार्फत ज्युडो चे प्रशिक्षण देत आहेत.
त्यांनी आता पर्यंत राष्ट्रीय आणि अंतरराष्ट्रीय खेळाडू घडविले आहेत. त्यांच्या तीन खेळाडूंना महाराष्ट्र शासनाने शिवछत्रपती पुरस्काराने गैरविले आहे. रवींद्र पाटील स्वतः राष्ट्रीय सुवर्ण पदका चे मानकरी आहेत.


