Wednesday, February 11, 2026

National

देवगड एसटी आगाराकडून निस्वार्थी सेवा करणाऱ्या श्री चंद्रकांत (आण्णा) इलकर आणि सौ.शुभांगी इळकर यांचा गौरव

देवगड – सिंधुदूर्ग जिल्हातील निस्वार्थी सेवा करत असलेले रहाटेश्वर कालवी वाडी येथील श्री चंद्रकांत (आण्णा) इलकर आणि सौ.शुभांगी इळकर या दांम्पत्यांचा देवगड एसटी व्यवस्थापक श्रीकांत सैतावडेकर यांच्याहस्ते नुकताच सत्कार करण्यात आला.

निस्वार्थी भावनेने केलेले कार्य हेच सर्वात पुण्य असून समाजात अश्या निस्वार्थ सेवेला समाजभूषण किंवा मानवसेवा पुरस्कार मिळणे हीच त्यांच्या खऱ्या अर्थाने कामाची पोचपावती आहे.असे केल्याने त्यांच्या सामाजिक कार्याला प्रोत्साहन देता येतेच परंतु समाजात एक चांगला संदेशही जातो.रहाटेश्वर कालवीवाडी येथील श्री आण्णा इलकर हे दांम्पत्य गेली 31 वर्षे येथील देवगड वानिवडे वस्तीच्या चालक आणि वाहक यांची निस्वार्थी सेवा करीत आहेत.बऱ्याच ठिकाणी एसटी हा गावागावात वस्तीत राहतात.या एसटीचे चालक आणि वाहन हे नवीन असायचे किंवा ते बाहेरील जिल्ह्यातील असल्यामुळे गावातील नव्या वस्तीत रहायचे कुठे..खायचे काय,पाणी तरी कसे उपलब्ध होणार असा प्रश्न त्यांच्यापुढे असायचा.

अश्यावेळी कोणतीही अपेक्षा न ठेवता,आपुलकीची साथ देणारा,प्रेमळ भावना असणारा इळकर आण्णा पुढे धावून यायचा.लांबून येणाऱ्या नव्या वाहन चालकांना आपल्याजवळ उपलब्ध असणाऱ्या सोयीसुविधा पुरवून द्यायचा.त्यांना राहण्यासाठी कोणतीच कसर कमी पडू द्यायचा नाही. त्यांचा हा गेली 31 वर्षाचा समाजसेवेचा प्रवास आजही असाच चालू आहे.श्री चंद्रकांत आण्णा यांचे वय सध्या 67 वर्षे असून त्यांनी आपल्या समाजसेवेची साथही सोडलेली नाही.त्यामुळे त्यांच्या याच कामाची पोचपावती म्हणून तालुका स्तरावर घेण्यात आली आहे.खुद्द बस व्यवस्थापक श्री श्रीकांत सैतावडेकर यांनी आपल्या वाहक आणि चालकांप्रती केलेल्या सेवेची आठवण ठेवून विशेष सत्कार केला आहे.खरं तर आत्ताच्या काळात माणुसकी हरवत असताना इळकर आण्णांचा आदर्श नवीन पिढीने घेतला तरी तो प्रेरणा देणारा ठरेल यात शंका नाही.

spot_img

International

RELATED ARTICLES