Tuesday, March 31, 2026

National

भांबेड जिल्हा परिषद गटात अचला विश्वासराव यांना जनतेतून वाढता पाठिंबा

लांजा दि.२२ (प्रतिनिधी)तालुक्यातील भांबेड जिल्हा परिषद गटातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने अचला उल्का हरिश्चंद्र विश्वासराव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महायुती समोर कडवे आव्हान उभे केले असून उच्चशिक्षित असणाऱ्या अचला विश्वासराव या निवडणुकीत नक्की विरोधकांना पराभूत करतील असा विश्वास भांबेड जिल्हा परिषद गटातून व्यक्त केला जात आहे. 

 तालुक्याच्या पूर्व विभागात अत्यंत महत्त्वपूर्ण ओळखला जाणारा भांबेड जिल्हा परिषद गट हा नेहमीच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो मात्र मध्यंतरी झालेल्या घडामोडीत या मतदारसंघातील अनेक कार्यकर्ते व तत्कालीन सदस्य यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने पक्षाची पडझड झाली होती मात्र जराही न डगमगता शिवसेनेच्या महिला उपजिल्हा संघटक उल्का विश्वासराव यांनी संपूर्ण तालुक्यात संघटना बांधणी करतानाच या भांबेड जिल्हा परिषद गटामध्ये देखील विशेष लक्ष देत संघटना बांधणे व वाढविण्याचे काम केले आहे त्यामुळेच पक्षाच्या वतीने अधिकृत उमेदवारी उल्का विश्वासराव यांच्या सुकन्या अचला विश्वासराव यांना देण्यात आली असून गेले अनेक महिने उल्का विश्वासराव व अचला विश्वासराव यांनी या मतदारसंघात वैयक्तिक गाठीभेटी वर जोर दिला होता आणि या निवडणुकीत पूर्ण ताकदीनिशी उतरल्या असल्याने शिवसेना शिंदे गट भाजप महायुती समोर उच्च शिक्षित असलेल्या अचला विश्वासराव यांनी कडवे आव्हान उभे केले असून त्यांच्या विजयासाठी निष्ठावंत शिवसैनिकांनी कंबर कसल्याचे दिसून येत आहे तर दुसरी कडे युवा सेनेला उमेदवारी देण्यात आल्याने युवा सैनिक देखील या प्रचारात उतरल्याचे दिसून येत आहे त्यामुळे विरोधकांनी धास्ती घेतल्याचे दिसून येत असून अचला विश्वासराव यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

spot_img

International

RELATED ARTICLES