Friday, April 3, 2026

National

“अनधिकृत बांधकामांवर कारवाईची भाषा, मात्र ठाणे महापालिकेला दिव्यातून कर वसुलीला मोठा हातभार!”

दिवा : दिवा शहरातील अनधिकृत बांधकामांचा प्रश्न अनेक वर्षांपासून चर्चेचा विषय ठरत आला आहे. विविध समाजसेवक आणि स्थानिक कार्यकर्ते सतत अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याची मागणी करत प्रशासनावर टीका करत असतात. मात्र या सर्व घडामोडींमध्ये एक वेगळी बाब समोर आली आहे.

अनधिकृत बांधकामांचा मुद्दा कायम असतानाही दिवा शहरातून स्थावर मालमत्ता कराच्या स्वरूपात 43 कोटींचा महसूल जमा होत असल्याचे दिसून येत आहे. ठाणे महानगरपालिकेच्या विक्रमी मालमत्ता कर वसुलीत दिवा शहराचा देखील चांगला वाटा असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

एका बाजूला बांधकामांवर कारवाईची भाषा केली जाते, तर दुसऱ्या बाजूला त्याच भागातून कररूपाने मोठा निधी पालिकेच्या तिजोरीत जमा होत असल्याने नागरिकांमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जर बांधकामे अनधिकृत असतील, तर त्यावर कर आकारणी आणि वसुली कशी केली जाते, असा सवाल स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे.

या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दिव्यातील बांधकामांची स्थिती, नियमितीकरण आणि कर वसुली याबाबत स्पष्ट भूमिका मांडण्याची गरज व्यक्त होत आहे.

spot_img

International

RELATED ARTICLES