ठाणे (प्रतिनिधी) अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड हाल झाल्याच्या पार्श्वभुमीवर ठाण्यातील ज्ञानदाता शिक्षण प्रसारक मंडळ,मुंब्रा या संस्थेने सामाजिक जाणीव लक्षात घेता येथील शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.या संस्थेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचा एक दिवसाचा पगार,विद्यार्थांनी खाऊसाठी ठेवलेले पैसे जमा करुन असा २ लाख ५१ हजार रुपयांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द केले आहेत.
ज्ञानदाता शिक्षण मंडळ मुंब्रा वेळोवेळी मदतीचा हात पुढे करत आलेली आहे. पूरग्रस्तांसाठी निधी गोळा करताना संस्थेच्या अनेक शाळांनी सहभाग दर्शविला.यामध्ये आदर्श प्राथमिक व माध्यमिक विद्यालय मुंब्रा,ज्ञानगंगा प्राथ.माध्यमिक मराठी विद्यालय कळवा(पुर्व),ज्ञानगंगा प्राय.माध्यमिक सेकंडरी आणि ज्यु.काँलेज कळवा (पुर्व),ज्ञानगंगा प्राथ.माध्य.हिंदी विद्यालय कळवा (पुर्व),नँशनल इंग्लिश स्कूल आणि ज्यु.काँलेज दिवा (पुर्व),तसेच सरस्वती इंग्लिश स्कूल आणि ज्यु.काँलेज कोपर(पुर्व) आदी शाळांनी पुढाकार घेतला.
मुसळधार पावसामुळे मराठवाड्यात अतिवृष्टी झाली आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. कधीकाळी अपुरा पाऊस आणि त्यामुळे नशीबी आलेला दुष्काळ यामुळे मराठवाडा हैराण होता. आता तोच मराठवाडा अतिवृष्टीमुळे बेहाल झाला आहे. मोठ्या प्रमाणावर शेतीचं नुकसान झालं आहे. पुरामुळे शेतातली सुपिक मातीही वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांवर मोठं संकट कोसळलंय. अशातच मराठवाड्याला पुन्हा ताठ मानेनं उभं करण्यासाठी अनेक हात सरसावले आहेत.
मदत गोळा करण्यासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री सुनिल फापाळे यांच्यासह संस्थेच्या सचीव सौ.सविता फापाळे,खजिनदार श्री अँड.अनिकेत फापाळे,प्रशासकीय अधिकारी सौ.बागुल मँडम,मुख्याध्यापक श्री खरमाळे,सौ.चौधरी,सौ.श्रद्धा साळवी मँडम,सौ.पूजा पाठक,सौ.मिश्रा मँडम,सौ.रोशनी चव्हाण व श्री आचरेकर सर यांनी विशेष मेहनत घेतली.


