ठाणे (प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टी, दिवा शिळ मंडळ आणि देवांशी हाँस्पीटल यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक २ आँगस्ट 2025 रोजी सकाळी.10 ते सायंकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान ओम साई अपार्टमेंट,बी.जे.पी.कार्यालय,मुंब्रा देवी काँलनी दिवा (पुर्व) येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर आणि आयुष्यमान भारत कार्ड शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.या शिबीरात डाँ.रंजनी सिंग या विशेष तपासणी करणार आहेत.
हे शिबीर दिवा येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे भारतीय जनता पार्टीचे ठाणे जिल्हा कार्यकारिणी सदस्य श्री रोशन प्रभाकर भगत आणि दिवा शिळ मंडळ महिला मोर्चाच्या अध्यक्षा सौ.सपनाताई रोशन भगत यांच्या पुढाकाराने संपन्न होणार आहे.दिवा शहरात सौ.सपनाताई रोशन भगत या महिलांच्या अनेक प्रश्नावर सातत्याने आवाज उठवित आहेत.दिव्यातील पोलीस चौकीच्या बीट क्र.४ येथे महिला पोलीस कर्मचारी असावेत यांनी आवाज उठविला आहे.महिलांना आपल्या समस्या बिनधिक्कपणे मांडता याव्यात यासाठी ते सतत प्रयत्नशील आहे.
त्यांच्या कार्याचा ठसा हळुहळु मुंब्रा देवी काँलनीत उमठत असून उद्या शनिवार दि.२ आँगस्ट रोजी मोफत आरोग्य शिबीर भरविणार आहेत.याआधीही गरजू व्यक्तींची सेवा सौ.सपनाताई भगत यांनी केली आहे.उद्या होणाऱ्या शिबीरात जनरल चेकअप,रक्त तपासणी,रँडम ब्लड शुगर आणि फास्टींग ब्लट शुगर डोळे तपासणी या शिवाय आयुष्यमान भारत कार्ड मिळवून देणे आदी सुविधा उपलब्ध करुन देणार आहे.
दिव्यातील जनतेने या मोफत शिबीराचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा असे आवाहन श्री व सौ.सपनाताई रोशन भगत यांनी केले आहे.