Monday, May 20, 2024
35.1 C
Delhi
Monday, May 20, 2024
spot_img
Homeक्राइमकवठेमहांकाळ तालुक्यातील इरळी या गावच्या शिवारात एमडी निर्माण करण्याचा कारखाना, १५० कोटींचे...

कवठेमहांकाळ तालुक्यातील इरळी या गावच्या शिवारात एमडी निर्माण करण्याचा कारखाना, १५० कोटींचे ड्रग्स जप्त

पुणे –  पुण्यातील गुन्हे अन्वेषण पथकाने सांगली पोलिसांच्या मदतीने पंधरा दिवसांपूर्वी कुपवाडमध्ये तीन ठिकाणी धाडी टाकून १४० किलो मेफड्रान हा अमली पदार्थांचा साठा जप्त केला होता. यावेळी तिघांना अटक करण्यात आली होती. मात्र, आता पुन्हा मुंबईतील गुन्हे शाखेला कवठेमहांकाळ तालुक्यातील इरळी या गावच्या शिवारात एमडी निर्माण करण्याचा कारखाना असल्याची माहिती मिळाल्यानंतर रविवारी छापा टाकण्यात आला.

पोलीस निरीक्षक नीरज उबाळे, आत्माजी सावंत आणि आठ ते दहा कर्मचार्‍यांची या ठिकाणी रविवार रात्रीपासून कारवाई सुरू असून कारखान्याचा मालक अद्याप हाती आलेला नाही. या ठिकाणी तपास पथकाच्या हाती १०० किलोहून अधिक एमडी अमली पदार्थ लागला असून त्याची मोजदाद सुरू आहे. कारखाना कोण चालवते, कोण कामगार आहेत, तयार माल कुठे आणि कुणाला पुरवला जातो याबाबतची माहिती घेण्यात येत असून या माहितीची शहानिशा झाल्यानंतरच माध्यमांना अधिकृत माहिती देण्यात येईल असे सांगण्यात आले. 

दरम्यान, मिरजेतील डॉ. आंबेडकर उद्यानाजवळ गांजा विक्री करत असताना एका तरुणाला रविवारी अटक करण्यात आली. आशितोष देवकुळे (वय २३ रा. वरची गल्ली, तासगाव) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्याकडून ७७ हजार ५०० रुपयांचा ३ किलो १०० ग्राम  गांजा जप्त करण्यात आला असून त्याच्याकडे असलेले वाहनही जप्त करण्यात आले आहे.  

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular