Monday, May 20, 2024
35.1 C
Delhi
Monday, May 20, 2024
spot_img
Homeक्राइममहाडमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार,पिडीत गर्भवती,दोघांना अटक

महाडमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार,पिडीत गर्भवती,दोघांना अटक

महाड : महाड तालुक्यामध्ये चोरी, घरफोडी, बलात्कार, लहान बालकांचे लैंगिक शोषण अशा अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे सतत घडत असतानाच तालुक्यातील बिरवाडी-ढालकाठी येथील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. पिडीत मुलगी ही गर्भवती असून आरोपींनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याचे निदर्शनास आले आहे.

आरोपी योगेश बाजीराव शिरावले (वय 22 रा.आकले), सुरज अनंत कळंबे (रा.वडघर, पोस्ट मोहोत, मूळ राहणार उमरट तालुका पोलादपूर) यांना महाड एमआयडीसी पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. या दोघांना सत्र न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांच्याविरोधात भादंवीस कलम 376, 376 (2) (एन) (के) (एफ), तसेच पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा अधिक तपास महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विक्रांत फडतरे हे करीत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular