Monday, May 20, 2024
40.6 C
Delhi
Monday, May 20, 2024
spot_img
Homeटेक्नोलॉजीआरटीई प्रवेश – online प्रक्रियेला सुरवात,शेवटची तारीख ३० एप्रिल

आरटीई प्रवेश – online प्रक्रियेला सुरवात,शेवटची तारीख ३० एप्रिल

शासनाच्या वतीने बालकांच्या मोफत सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्याअन्वये ही प्रक्रीया राबविली जात असून यामध्ये असलेल्या 25 टक्के आरक्षित जागांवर प्रवेशासाठी लहान मुलांचे अर्ज भरण्याप्रक्रीया ऑनलॉईन पध्दतीने 16 एप्रिल 2024 पासून सुरु होणार आहे.

या शैक्षणिक वर्षाकरीता आरटीई प्रवेशाबाबत राज्याभरातील शाळा यांनी नोदंणीसाठी दिलेल्या मुदतीत बहुतांशी शाळांची नोंद नसल्याने पुन्हा शाळा नोंदणीकरीता मुदत वाढ देण्यात आली आल्याने आरटीई प्रवेश प्रक्रिया लांबल्याची माहिती आहे

सन 2024-25 या शैक्षणिक सत्राकरीता शासनाच्या वतीने बरेच बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार विद्यार्थ्यांना पहिले अनुदानित, शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. पुर्वी विद्यार्थ्यांकरीता फक्त इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश दिला जात होता.

आता यावर्षीपासून आरटीई प्रेवश प्रक्रीयेत इंग्रजी शाळांचा पर्याय हा शेवटी ठेवण्यात आलेला आहे. या वर्षी आरटीई प्रवेशाबाबतची नियमावली बदलेली असून विद्यार्थ्यांना प्रवेश देतांना अनुदानित शाळा, शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व शाळा व त्यानंतर स्वंय अर्थसहाय्यीत शाळा या अनुक्रमाला अनुसरुन प्रवेश प्रक्रीयाला प्राधान्य दिले जाणार आहे.

पालकास जर प्राधान्याने जर अनुदानित शाळेऐवजी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेची अथवा शासकीय शाळेची निवड करावयाची असल्यास पालकाच्या प्राधान्य क्रमानुसार संबधित शाळा निवडता येणार आहे

विद्यार्थ्यांच्या राहत्या घरापासून एक किलोमीटर पर्यंतच्या अंतरावर असलेल्या अनुदानित शाळा, शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा नसल्यास आणि एक कि.मी. अंतरावर स्वयं अर्थसहाय्यीत शाळा असेल तर अशा स्थितीतच त्या स्वंय अर्थसहाय्यीत शाळेत मुलांना आरटीई अंतर्गत प्रवेश दिला जाणार आहे

या शैक्षणिक वर्षाकरीता आरटीई अन्वेय दुर्बल, वंचित, शैक्षणिक व सामाजिक दृष्टया मागासवर्गीय घटकांकरीता 25 टक्के आरक्षीत जागांवरील ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत पालकांना ऑनलाईन अर्ज भरण्यासाठीची प्रक्रीया येत्या 30 एप्रिल 2024 पर्यंत राहणार आहे.

अर्ज भरण्याकरीता खालील पोर्टलच्या लिंकवर क्लिक करुन अर्ज दाखल करु शकता.
https://student.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rte_index_new

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular