Monday, May 20, 2024
35.1 C
Delhi
Monday, May 20, 2024
spot_img
Homeटेक्नोलॉजीकोची केरळ येथे झालेल्या लांब पल्ल्याच्या आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेंत ठाणेकर जलतरणपटूंचा दबदबा

कोची केरळ येथे झालेल्या लांब पल्ल्याच्या आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेंत ठाणेकर जलतरणपटूंचा दबदबा

ठाणे – नुकत्याचं कोची केरळ येथील पेरियार नदीत लांबपल्ल्याची जलतरण स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत भारत मलेशिया, थायलंड, श्रीलंका या देशातील जलतरणपटू सहभागी झाले होते. स्पर्धेसाठी १६ किमी , १० किमी , ६ किमी , २ किमी, ४०० मिटर अशा विविध अंतरआमध्यए या स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत ४ देशातील ६१० स्पर्धकांचा समावेश होता. यात ठाण्यातील स्टारफिश स्पोर्ट्स फाउंडेशन चे ११ जलतरणपटू सहभागी झाले होते

या स्पर्धेत १६ किमी गटात स्टारफिश फाउंडेशनच्या मानव राजेश मोरे याने १८ वर्षावरील गटात प्रथम क्रमांक पटकावला.
 १६ किमी संपूर्ण मुलांच्या गटात आयूष प्रविण तावडे याने  तृतीय क्रमांक व सोहम प्रशांत पाटील याने चौथा क्रमांक पटकावला. १६ किमी मुलींच्या संपूर्ण गटात स्नेहा नवनाथ लोकरे हीने द्वितीय क्रमांक पटकावला

१० किमी स्पर्धेत १८ वर्षाखालील मुलांच्या गटात कैवल्य माधवी राणे याने प्रथम क्रमांक पटकावला तसेच संपूर्ण १० किमी स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त केला. १० किमी मुलींच्या गटात श्रृती सचिन जांभळे हिने ४ था क्रमांक पटकावला

६ किमी स्पर्धेत मुलीच्या १८ वर्षांखालील गटात आयुषी कैलाश आखाडे हिने प्रथम क्रमांक तर १२ वर्षाखालील गटात किमया केदार गायकवाड हिने द्वितीय क्रमांक पटकावला

२ किमी मुलांच्या स्पर्धेत ओजस राजेश मोरे याने ४ था तर मुलींचा १२ वर्षाखालील गटात माही सचिन जांभळे हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला.  ४०० मिटर संपूर्ण स्पर्धेत शर्वण अनिल पेठे याने प्रथम क्रमांक पटकावला

 हे सर्व जलतरणपटू प्रशिक्षक कैलास आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणाचे धडे घेत आहे. या सर्व जलतरणपटूंचे ठाणे जिल्हा हौशी जलतरण संघटना अध्यक्ष व आमदार श्री निरांजन डावखरे,सचिव अतुल पुरंदरे महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेचे सदस्य राजेश मोरे, महापालिकेच्या क्रीडाअधिकारी मीनल पालांडे, , तरणतलाव उपव्यवस्थापक रवी काळे यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular