Wednesday, February 11, 2026

National

ठाणे लोकसभा मतदारसंघातील रेल्वे स्थानकांवरील विकासकामे तात्काळ पूर्ण करा,  अन्यथा जनआंदोलन

ठाणे – ठाणे लोकसभा मतदारसंघातील सर्व रेल्वे स्थानकांवर प्रवाशांसाठी मुलभूत सोयीसुविधा देण्यात मध्ये रेल्वे प्रशासनाकडून दिरंगाई होत आहे. खासदार नरेश म्हस्के यांनी मध्ये रेल्वेचे महाप्रबंधक धर्मवीर मीना यांची आज भेट घेऊन बैठक घेत चांगलाच सज्जड दम देत लवकरात लवकर विकासकामे पूर्ण न केल्यास जनआंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

आरएलडीएच्या माध्यमातून ठाणे रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास लवकरात लवकर होणे अपेक्षित आहे. ठाणे स्थानकाच्या पुनर्विकासासाठी डीपीआर मास्टर प्लॅनच्या माध्यमातून ९५० कोटी रुपयांचा प्रस्ताव २६ मे २०२३ रोजी रेल्वे प्राधिकरणाने पाठविला आहे. मी निवडून आल्यापासून या विकासकामासाठी नियमित पाठपुरावा करत आहे. मात्र अद्याप पुनर्विकासाची प्रक्रिया सुरू झालेली नाही. मास्टर प्लॅन पाठवून सुद्धा दोन वर्षांहून अधिक काळ लोटला तरी काम सुरु न झाल्याबद्दल खासदार नरेश म्हस्के यांनी बैठकीत नाराजी व्यक्त केली.

 बैठकीला डीजीएम के. के. मिश्रा, डीआरएम हरीश मीना, एस. एस. गुप्ता आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

ठाणे रेल्वे स्थानकातील मुंबईच्या (सीएसएमटी) दिशेने जाणाऱ्या फलाट क्रमांक १० वरुन मोठ्या संख्येने महिला वर्ग प्रवास करत असतात. फलाटावर छत नसल्याने पावसाळ्यात महिलांना गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याची बाब महाप्रबंधकांच्या निदर्शनास खासदार नरेश म्हस्के यांनी आणून देत लवकरात लवकर यावर मार्ग काढण्याची सूचना केली.  

ठाणे ते मुंबई (सीएसएमटी) कडे जाणाऱ्या फलाटावर अजून एक पादचारी पूल बांधणे आवश्यक आहे. हा पादचारी पूल फलाट क्रमांक १ ते फलाट क्रमांक ७ आणि ८ नंबरला पूर्व आणि पश्चिम असा जोडला जाईल. ते काम तातडीने सुरु करावे. ठाणे रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक ५ ते फलाट क्रमांक १० ला जोडणाऱ्या पादचारी पूलाच्या पुनर्बांधणीचे काम अपूर्ण असून ते तात्काळ मार्गी लावावे. वर्तकनगर येथील आरक्षण केंद्रात एक शौचालय (पुरुष/महिला) बांधावे. केंद्रात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, आरक्षण केंद्राचे नूतनीकरण करावे. नव्याने वायरिंग, खिडक्या दुरुस्ती, रंगरंगोटी, बैठक व्यवस्था इत्यादी कामे त्वरित पूर्ण करुन नागरिकांना दिलासा द्यावा, अशी सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी बैठकीत केली.

spot_img

International

RELATED ARTICLES