Sunday, July 26, 2026

National

दिवा प्रभागसमितीतस११ नगरसेवकांचा दबदबा,तरीही शिळ-दिवा रोड खड्ड्यात; नागरिकांचा संताप

दिवा | (विनोद वास्कर) : दिवा प्रभाग समितीमध्ये तब्बल ११ नगरसेवक असतानाही शिळ-दिवा रोडची अवस्था दिवसेंदिवस अधिकच बिकट होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. सुदामा ग्रील ते अग्निशामक दल स्थानकापर्यंत रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.
     सुदामा ग्रील, डम्पिंग रोड, दिवा सर्कल, महाकालेश्वर मंदिर, दुर्गा मंदिर आणि अग्निशामक दल परिसरात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. विशेषतः दुचाकीस्वारांना मोठा त्रास सहन करावा लागत असून अनेक लहान-मोठे अपघात झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली.
“दररोज याच रस्त्याने ये-जा करणाऱ्या लोकप्रतिनिधींना हे खड्डे दिसत नाहीत का?” असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. “आम्ही कर भरतो, पण सुरक्षित रस्ते मिळत नाहीत. एका खड्ड्यात गाडी गेली की वाहनाचे नुकसान होते आणि जीव धोक्यात येतो,” अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी व्यक्त केली.
       अपघाताचा वाढता धोका
रात्री अपुऱ्या प्रकाशामुळे खड्डे दिसत नसल्याने अपघातांची शक्यता वाढली आहे.
महाकालेश्वर मंदिर व दुर्गा मंदिर परिसरात शालेय विद्यार्थ्यांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
खड्ड्यांमुळे वाहनांच्या टायर, सस्पेन्शन आणि इतर भागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
     स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, ठाणे महापालिका, दिवा प्रभाग समिती आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अनेकदा तक्रारी करूनही अद्याप ठोस कार्यवाही झालेली नाही.
      नागरिकांच्या प्रमुख मागण्या
शिळ-दिवा रोडवरील सर्व खड्डे तातडीने बुजवावेत.
रस्त्याची कायमस्वरूपी आणि दर्जेदार दुरुस्ती करावी.
अपघात झाल्यास जबाबदारी निश्चित करून संबंधितांवर कारवाई करावी.

spot_img

International

RELATED ARTICLES