ठाणे – सौदी अरबियातील दुबई येथे नुकतीच आयोजित करण्यात आलेल्या ‘फिसाफ आशियाई एरोबिक्स आणि हिपहॉप स्पर्धा २०२५’ या स्पर्धे मध्ये सहा भारतीय मुलींनी कौतुकास्पद कामगिरी करून देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. ‘महाराष्ट्र कन्या’ असलेल्या या मुलींनी फिटनेस एरोबिक्स आणि स्पोर्टस् एरोबिक्स या क्रिडा प्रकारांत ऐकुण १६ सुवर्ण व ६ रौप्य पदके पटकावली तसेच हीप-हॉप मध्ये एका करंडकावर (ट्रॉफी) आपले कोरले. विशेष म्हणजे विजेत्या सर्व सहाही मुली ठाण्यातील श्री माँ विद्यालय या शाळेच्या विद्यार्थिनी आहेत.
फिटनेस एरोबिक्समध्ये सांची तावडे हिने 4 सुवर्ण व १ रौप्य पदक जिंकले तर साची पटेल हिने ३ सुवर्ण व २ रौप्यपदके, पंथी पोकर हिनेही ३ सुवर्ण व २ रौप्यपदके पटकावली आहेत. तसेच वैयक्तित स्पोर्टस एरोबिक्स श्रेणीमध्ये यज्ञी घाडीगावकर व अमूल्या राणे यांनी प्रत्येकी एक सुवर्णपदक जिंकले. आदिती वाल्मिकी हिने ४ सुवर्ण व १ रौप्यपदक मिळवून फिटनेस एरोबिक्स मधील आपला दबदबा सिद्ध केला. हिप-हॉप मध्ये आदितीने एक करंडक जिंकला. सर्व विजेत्या विद्यार्थिनींच्या या देदिप्यमान यशात त्यांच्या प्रशिक्षक रोहिणी गाडगीळ यांचा मोलाचा वाटा होता.
आशियाई एरोबिक्स व हिप-हॉप विजेतेपद स्पर्धेत महाराष्ट्र कन्यांची कामगिरी१६ सुवर्ण, ६ रौप्य पदके