दिवा (प्रतिनिधी) स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका जवळपास निश्चित झाल्याचे सांगण्यात येत आहे.याच पार्श्वभुमीवर जर नव्या चेहऱ्यांना संधी द्यायची झाल्यास जनतेने कोणत्या लोकप्रतिनिधींना दिव्यातून निवडून द्यावे याबाबत सोशल मिडीयावर प्रश्न विचारला जात आहे..एवढेच नव्हे तर या नव्या चेहऱ्यांना दिल्यास दिव्यातील विकासाच्या मुद्द्यावर ठाणे महानगरपालिकेशी लढतील आणि नागरी सुविधा निर्माण करतील असे त्यांना वाटत आहे.
दिव्याची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे.आणि वाढलेल्या लोकसंख्येच्या प्रमाणात येथील नागरिकांना काही नागरी सुविधांची वाणवा भासत असल्याचे पहायला मिळत आहे. या समस्या मांडायच्या कोणाकडे यासाठी त्यांना हक्काचा नगरसेवक हवा असल्याचे यातून दिसून येत आहे.सध्या दिवा शहर हे ठाणे महानगरपालिकेत येत आहे . परंतु ठाणे महानगरपालिकेकडून नेहमीच दिवा शहराला दुय्यम वागणुक दिली जाते.येथे असलेले अस्वच्छ गटार,विकास आराखड्याची वाणवा, टाटा पाँवरलाईन रस्त्यांचे खड्डे,दिवा फाटक आणि आगासन फाटक येथील उड्डाण पुल,स्वतंत्र पोलीस ठाणे,गार्डन,मैदाने,सांस्कृतिक भवन,नाट्यगृह, पाणी प्रश्न, आरोग्याचा प्रश्न, रेल्वे वाहतुकीचा प्रश्न इतर अनेक नागरी सुविधांमुळे येथील नागरिक भरडलेला आहे.
दरम्यान बऱ्याच आता वर्षांनी नगरसेवकांच्या निव़डणुका होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.कित्येक वर्षे नगरसेवक नसल्यामुळे नागरिकांना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागत आहे.पालिकेत प्रशासनाच्या हस्तक्षेपामुळे, आणि रटाळ कामांमुळे नेमका न्याय कुठे मागयचा असे यक्ष प्रश्न नागरिकांना पडलेला असे. त्यामुळे जनतेचा प्रश्न मांडणारा लोकप्रतिनिधी नसल्याची खंत आजही भासत आहे.नागरिकांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे दिवा प्रभाग समिती हद्दीत भविष्यात निवडणुकूच चुरशीची होण्याची शक्यता आहे.कारण पुर्वी माजी झालेल्या नगरसेवकांपेक्षा आता नवीन चेहरे उभे रहावेत अशी नागरिकांची इच्छा असलेली पहायला मिळते आहे.अश्या चेहऱ्यांना सोशल मिडीयांत कमालीची पसंती मिळत आहेत.हे नवे चेहरे दिव्याच्या विकासासाठी, अन्यायाविरोधात नक्कीच आवाज उठवतील असे सर्वांना वाटत आहे.
या नवीन चेहऱ्यांपैकी महिलांच्या बाबतीत पहायचे झाले तर, भारतीय जनता पक्षाच्या दिवा महिला मोर्चाच्या अध्यक्षा सौ.सपनाताई भगत यांचे नाव चर्चिले जात आहेत.शिवाय साबे येथून आपल्या भाषणातून धाडशीपणा दाखविणाऱ्या शिवसेनेच्या (शिंदे गट) सौ.अर्चनाताई पाटील यांनाही मोठी पसंती आहे.त्यानंतर शिवसेना (उबाठा गट) तन्वी फाऊंडेशनच्या सर्वेसर्वा ज्योतीताई पाटील यांचंही नाव सोशल मिडीयावर नगरसेवक या पदासाठी पसंतीस आहे.शिवाय पुरुष लोकप्रतिनिधींसाठी नगरसेवक म्हणून सध्या दिव्याच्या नागरिकांसाठी जिवाची बाजी लावणारे धडाकेबाज समाजसेवक श्री अमोल केंद्रे यांचेही नाव चर्चेत आहे.याशिवाय मनसेचे श्री तुषार पाटील, श्री प्रशांत गावडे, दिव्याचे अभ्यासू लोकसेवक श्री विजय भोईर, युवा नेतृत्व श्री सचिन भोईर,युवा नेतृत्व श्री प्रकाश पाटील,युवा नेतृत्व श्री सचिन राम पाटील,युवा नेतृत्व आदेश भगत,युवा नेतृत्व रोहीदास मुंडे यांची नावे प्रामुख्याने सोशल मिडीयावर चर्चेत असल्याचे पहायला मिळत आहे.


