लांजा (प्रतिनिधी )लांजा कुवे शहरातील जनतेचा ठाम विरोध असताना देखील विकास आराखडा लागणारे तसेच डम्पिंग ग्राउंड च्या विरोधात ९३ दिवस आंदोलन करणाऱ्या स्थानिक जनतेला साधी भेट सुद्धा न देणारे लांजा शहराचा विकास काय करणार? शिंदे सेना व भाजप हे फक्त धन दाडग्यांचा विकास करण्यासाठी सत्तेत आले असून लांजा कुवे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेना महाविकास आघाडीच्या पूर्वाताई मुळे यांनाच नगराध्यक्ष म्हणून विजयी करण्याचे आवाहन शिवसेनेचे लांजा तालुका संपर्कप्रमुख जगदीश जुलूम यांनी लांजा येथे केले.
लांजा नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज लांजा तालुका शिवसेना संपर्क कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधताना जगदीश जुलून बोलत होते यावेळी तालुकाप्रमुख सुरेश करंबळे, तालुका युवा तालुका अधिकारी अभिजीत राजेशिर्के, विभाग प्रमुख विश्वास मांडवकर यांच्यासह अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते
लांजा कुवे शहरातील जनतेची घरे – दारे उद्ध्वस्त होऊन तसेच शेती व अन्य जमीन विकास आराखडा मुळे जात असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे याला स्थानिक जनतेचा कडाडून विरोध असताना देखील केवळ धनदांडगे व बिल्डर यांचा फायदा होण्यासाठी विद्यमान नगराध्यक्ष व त्यांचे लोकप्रतिनिधी यांनी हा लांजा विकास आराखडा मंजूर करण्याचा घाट घातला आहे मात्र याला स्थानिक जनता कडाडून विरोध करीत आहे असे असताना देखील खोटी आश्वासन देऊन त्यात बदल करण्याचे भासवले जात आहे मात्र या विकास आराखड्यामुळे सर्वसामान्य जनतेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असून त्याला शिवसेना महाविकास आघाडीने कडाडून विरोध केलेला आहे तसेच डम्पिंग ग्राउंडच्या विरोधात तेथील स्थानिक जनता अर्थात कोत्रेवाडी येथील ग्रामस्थ यांनी ९३ दिवस रस्त्यावरती धरणे आंदोलन केले होते मात्र त्यांना साधी भेट देण्याचे सौजन्य देखील विद्यमान आमदार यांनी दाखवले नाही जर स्थानिक जनतेचा विरोध असेल तो विरोध सत्ताधाऱ्यांनी मान्य केला पाहिजे परंतु तो विरोध दडपून टाकण्याचा प्रयत्न सत्ताधारी करीत असून त्याचा रोष या निवडणुकीत जनता दाखवल्याशिवाय राहणार नाही.
राज्यात व केंद्रात सत्ता असून देखील गेल्या पाच वर्षात लांजा शहराचा विकास करण्यात अपयशी ठरलेले तसेच स्थानिक जनतेला नको असणारा विकास आराखडा रद्द करण्यात अपयश आलेले याचबरोबर मोठा आर्थिक गैरव्यवहार करीत स्थानिक जनतेला नको असणारा डम्पिंग ग्राउंड प्रकल्प लादून तेथील जनतेचे जीवन भकास करणाऱ्या शिवसेना शिंदे गट व भाजप महायुतीच्या नगराध्यक्षपदासह सर्व नगरसेवकांचा येथील जनतेने पराभव करून लांजा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेना महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार तसेच उच्च शिक्षित नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार पूर्वा मुळे यांना विजयी करण्याचे आवाहन लांजा तालुका संपर्क प्रमुख जगदीश जुलूम यांनी केले आहे .

