दिवा (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी दिवा मंडळ अध्यक्ष सचिन भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला मोर्चा आयोजित दिवा भागातील आगासन येथे ठाणे महानगरपालिका आरोग्य विभागाच्या माध्यमातून महिलांसाठी मोफत मेमोग्राफी शिबीर उत्साहात पार पडले.
आगासन गावात प्रथमच दत्त मंदिर येथे दिवा भाजप महिला मोर्चा अध्यक्षा सौ. सपनाताई रोशन भगत यांच्या पुढाकाराने या शिबिरात महिलांसाठी मोफत ब्रेस्ट कॅन्सर अवेरनेस व मेमोग्राफी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबीर सकाळी ११ वाजेपासून संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सुरु होते. शिबिरात महिलांना स्तनाच्या कर्करोगाबाबत जनजागृती करुन त्यांची आवश्यक तपासणीसह मोफत मॅमोग्राफी सुविधा उपलब्ध करून देण्यात आले. तसेच पात्र लाभार्थ्यांसाठी आयुष्मान भारत योजनेअंतर्गत आरोग्य विमा कार्ड तयार करुन देण्यात आले आहे.
हे शिबीर ठाणे जिल्हा कार्यकारिणी सदस्य व संयोजक रोशन भगत व दिवा मंडळ अध्यक्ष सचिन भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आले होते. महिलांच्या आरोग्याबाबत जागरूकता वाढावी, कर्करोगासारख्या आजारांचे लवकर निदान व्हावे आणि गरीब व गरजू महिलांना मोफत आरोग्य सुविधा मिळाव्यात हा या शिबिराचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. दिवा परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने आपली उपस्थिती दर्शवून या शिबिराचा लाभ घेतला.
सदर कार्यक्रमात भारतीय जनता पार्टी दिवा शीळ मंडळ अध्यक्ष सचिन भोईर, दिवा शीळ मंडळ उपाध्यक्ष नितीन कोरगावकर, ठाणे जिल्हा ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष विनोद भगत, सुधीर म्हात्रे, प्रवीण पाटील, रेश्मा पवार, ठाणे जिल्हा उपाध्यक्ष विजय भोईर, जिलाजीत तिवारी, अशोक गुप्ता, विठ्ठल गावडे, विजय वाघ, राकेश पंडित, प्रकाश पाटील, गणेश सावंत, दिनेश जाधव, आगरी महिला शक्ती प्रतिष्ठानच्या अध्यक्षा उषा मुंडे तसेच सर्व भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

