लांजा दि.२९( प्रतिनिधी) लांजा कुवे नगरपंचायत हद्दीतील सुज्ञ मतदाराने कोणत्याही फसव्या आमिषाला व भूलथापा यांना बळी न पडता शिवसेना महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन शिवसेनेचे लांजा तालुका संपर्कप्रमुख जगदीश जुलूम यांनी प्रचारादरम्यान कुवे येथे केले .
लांजा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार पूर्वामुळे यांच्यासह कुवे येथील प्रभाग क्रमांक १४ व १३ तसेच अन्य प्रभागातील उमेदवारांच्या प्रचारासाठी गाठीभेटी व प्रचार रॅली आज सकाळी ११ वाजता कुवे येथे काढण्यात आली यावेळी मतदारांशी थेट संवाद साधताना लांजा तालुका संपर्कप्रमुख जगदीश जुलूम यांनी मतदारांना आवाहन केले यावेळी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार पूर्वा मुळे ,लांजा तालुकाप्रमुख सुरेश करंबळे, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश लांजेकर शिवसेनेच्या महिला उपजिल्हा संघटिका उल्का विश्वासराव, तालुका युवा अधिकारी यांच्यासह शेकडो शिवसैनिक तसेच महाविकास आघाडीचे पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
शिवसेना शिंदे गट व भाजप यांच्याकडून मतदारांना फसवी आश्वासन व वेगवेगळी आमिषे दाखवण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे मात्र ज्यांना सत्ता असूनही लांजा कुवे शहराचा विकास करता आला नाही ते आता विकास काय साधणार? असा संतप्त सवाल देखील लांजा तालुका संपर्कप्रमुख जगदीश जुलम यांनी केला आहे तर लांजा कुवे शहराच्या विकासासाठी शिवसेना महाविकास आघाडी शिवाय पर्याय नाही त्यामुळे गद्दराना गाडून मतदाराने महाविकास आघाडीच्याच उमेदवारांना विजय करून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली अर्पण करावी असे भावनिक आवाहन देखील जगदीश जुलमी यांनी केले.
यावेळी लांजा तालुका प्रमुख सुरेश करंबळे यांनी शिवसेना शिंदे गट तसेच भाजप यांच्यावर कडाडून टीका करताना सांगितले की सांगितले की ज्याने शिवसेनाप्रमुखांना दुःख दिले पक्ष चोरला तेच आज शिवसेना आमची आहे असे ओरडून सांगत आहेत मात्र हे राज्याच्या विकासासाठी गेलेले नसून आपल्या स्वतःच्या व कुटुंबाच्या विकासासाठी शिवसेनाप्रमुखांचा विश्वासघात केलेले नतदृष्ट असून यांचा या निवडणुकीत पराभव करून यांची जागा मतदारांनी दाखवून देऊया तसेच लांजा कुवे नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार पूर्वा मुळे या उच्चशिक्षित असून त्यानी उपनगराध्यक्ष पदाचा कार्यभार पाहिलेला आहे लांजा शहराचा विकास कसा करावा याचा सुनियोजित प्लॅन त्यांच्याकडे असून त्या नगराध्यक्ष म्हणून विजयी झाल्या तर लांजा शहराचा सर्वांगीण विकास होऊ शकतो असे ठाम प्रतिपादन तालुकाप्रमुख सुरेश करंबळे यांनी केले असून शिवसेना महाविकास आघाडीलाच मतदारांनी विजयी करण्याचे आवाहन देखील त्यांनी या प्रचारादरम्यान केले. यावेळी कुवे येथील शेकडो महाविकास आघाडीचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
लांजा कुवे नगरपंचायत हद्दीतील सुज्ञ मतदाराने कोणत्याही भूलथापांना बळी न पडता शिवसेना महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा – तालुका संपर्कप्रमुख जगदीश जुलूम