लांजा नगरपंचायत आणि राजापूर नगरपरिषदवर एक हाती सत्ता येणार – सामंत
लांजा राजापूरच्या जनतेने केलेल्या मतदाना बद्दल आमदार किरण सामंत यांनी मानले आभार
राजापूर : आमदार किरण सामंत यांनी आपल्या राजकीय प्रवासातील एक महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. *“ज्या वेळेस आमदार झालो, त्यावेळी राजापूर नगरपरिषदेत भगवा फडकवण्याची शपथ घेतली होती. ती मी येत्या २१ डिसेंबरला पूर्ण करणार आहे,” असे विधान त्यांनी केले.*
२३ नोव्हेंबर २०२४ ला घेतलेली शपथ २१ डिसेंबरला २०१५ ला राजापूरवासियांच्या विश्वासावर पूर्ण करणार असलेल्यांचे आमदार किरण सामंत यांनी जाहीर केले.
येत्या नगरपरिषद निवडणुकीत विरोधकांवर ‘धोबी पछाड’ करीत शिवसेना महायुती एकहाती सत्ता मिळवू शकते, अशी राजकीय चर्चा राजापूरमध्ये जोर धरत आहे. स्थानिक पातळीवर महायुतीने अलीकडे केलेल्या संघटनात्मक हालचाली आणि वाढलेला जनसमर्थनाचा कल यामुळे हा अंदाज व्यक्त केला जात आहे.
नगरपरिषदेत महायुतीची पकड मजबूत होत असल्याचे काही स्थानिक पदाधिकाऱ्यांचेही मत आहे. विरोधक मात्र हे दावे फोल असल्याचे सांगत असून जनतेचा कौल त्यांनाच मिळेल, असा विश्वास व्यक्त करत आहेत.या राजकीय घडामोडींमुळे राजापूरमधील निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. पुढील काही दिवसांत विविध पक्षांच्या हालचालींमुळे चित्र अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे.या घोषणेने राजापूर शहरात राजकीय चर्चांना ऊत आला आहे. समर्थकांकडून या निर्णयाचे स्वागत होत असताना पुढील काही दिवसांत नगरपरिषदेत घडणाऱ्या घडामोडींवर सर्वांचे लक्ष केंद्रीत राहणार आहे.
आमदार सामंत यांची ही घोषणा स्थानिक राजकारणात नवा उत्साह निर्माण करणारी असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

