Wednesday, March 18, 2026

National

दिव्यातील ड्यु ड्राप शाळेत घडतोय अजब प्रकार, मुलांना बाथरुमसाठी दिले सांडपाणी

दिवा (प्रतिनिधी ) दिवा शहरातील मातोश्रीनगर परिसरात अजब प्रकार उघडकीस आला आहे.येथील ड्यु ड्राप स्कूल शाळेत शिकणाऱ्या मुलांना बाथरुमसाठी चक्क सांडपाणी वापरण्यास देण्यात येत असल्याचा प्रकार मनसेकडून उघडकीस आला असून या विरोधात आता मनसेने चक्क शाळेची मान्यताच रद्द करण्याची मागणी केली आहे.

मनसेच्या शाख्याध्यक्षा अंकिता कदम यांच्याकडे बऱ्याच महिलांनी याबद्दल तक्रार घेवून आल्या होत्या.या प्रकाराची मनसेचे शहर सचिव प्रशांत गावडे,विभाग अध्यक्ष प्रकाश पाटील,उपविभाग अध्यक्ष शैलेंद्र कदम,उपाध्यक्ष जितेंद्र गुरव,शाखाध्यक्षा अंकिता कदम यांनी पाहणी केली असता सांडपाणी असलेल्या डबक्यात पाईप टाकण्यात आल्याचे निदर्शनास आले.हे सांडपाणी मुलांच्या बाथरुमसाठी वापर होत असल्याचे समजताच अनेकांची माथी भडकली.

मुलांच्या आरोग्याशी खेळ

हे सांडपाणी अत्यंत प्रदुषित असल्याचे निदर्शनास आले असून त्याचा वापर शाळा प्रशासन मुलांना बाथरुमच्या वापरासाठी करत होती. या दुषित पाण्यामुळे मुलांच्या आरोग्याचा मोठा धोका निर्माण होऊ शकतो.शाळा प्रशासनाच्या या निष्काळजीपणामुळे नागरिकांत संताप व्यक्त करण्यात येत आहे.याबाबत दिवा मनसेकडून शाळेचे संचालक उत्तम सावंत यांच्यावर गुन्हा दाखल करुन शाळेची मान्यताच रद्द करावी अशी मागणी शिक्षण विभागाचे उपायुक्त सचिन सांगले यांच्याकडे करण्यात येत आहे.

spot_img

International

RELATED ARTICLES