Wednesday, March 4, 2026

National

राज्य नाट्य स्पर्धेत द्वितीय ठरलेल्या ‘ईठ्ठला’ नाटकावर अभिनंदनाचा वर्षाव; प्रेक्षकांचा वाढता प्रतिसाद

लांजा (प्रतिनिधी)लांजा तालुक्यात सांस्कृतीक क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या अमोल रंगयात्री या नाट्य संस्थेने रत्नागिरी येथे झालेल्या राज्य नाट्य स्पर्धेत आपला पुन्हा एकदा ठसा उमटविला. स्पर्धेच्या अंतिम क्षणी सादर झालेल्या नाटकाला हाऊसफुल्लचा प्रतिसाद मिळाला. प्रेक्षकांच्या हृदयाचा ठाव घेत मराठी राज्य नाट्य स्पर्धेत रत्नागिरी केंद्रातून ‘ईठ्ठला’ या नाट्य कलाकृतीने द्वितीय क्रमांक पटकावला.
  लांजा तालुक्यातील अमोल रंगयात्री या नाट्य संस्थेने सादर केलेल्या या नाट्यकलेला परीक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाली. अमोल रेडीज यांनी लेखन केलेल्या ईठ्ठला नाटकाने दिग्दर्शनाचे द्वितीय क्रमांकाचे पारितोषिकही प्राप्त केले. तर नेपथ्य प्रकारात संदीप सावंत यांनी द्वितीय, प्रकाश योजना दयानंद चव्हाण यांनी द्वितीय, तर रंगभूषा गजानन पांचाळ, वेशभूषा संतोष डोर्लेकर द्वितीय तर संगीत दिग्दर्शनासाठी प्रदीप कांबळे यांना द्वितीय क्रमांक प्राप्त झाला आहे. यासह प्रमुख भूमिका साकारणारे अमोल मारुती रेडीज आणि अर्चना पेणकर-पांचाळ यांना अभिनयाचे गुणवत्ता प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली. या नाटकाची राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली आहे. काही वर्षांपूर्वी याच नाट्य संस्थेच्या जिहाद नाटकाला झी गौरव मानांकनही प्राप्त झाले आहे. त्यानंतर नुकत्याच पार पडलेल्या राज्य नाट्य संस्थेच्या रत्नागिरी केंद्रात अमोल रंगायत्रीच्या ईठ्ठला या नव्या नाट्य कलाकृतीने मजल मारली आहे. ईठ्ठला नाटकाला द्वितीय क्रमांक प्राप्त होताच जिल्हाभरातून अमोल रंगयात्रीच्या नाट्य कलावंत व संपूर्ण टीमवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
    खरंतर अत्यंत प्रभावी असणारे ईठ्ठला हे नाटक हृदयाचा ठाव घेऊन, प्रेक्षकांना खिळवून ठेवते व विचारशील बनवते. नाटकातील पात्र।आणि तंत्रज्ञ टीम या सर्वांनी घेतलेली मेहनत स्पर्धेत दिसून आली आणि स्पर्धेत द्वितीय ठरले. ईठ्ठला नाटकाच्या संपूर्ण टीमचे लांजा वासीयांकडून कौतुक करण्यात येत असून राज्यनाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.

spot_img

International

RELATED ARTICLES