Wednesday, February 11, 2026

National

हेरिटेज प्रयोगभूमी जावडे येथून अनेक गुणवंत व दर्जेदार खेळाडू तयार होतील – सहाय्यक संचालक उदयसिंह गायकवाड

लांजा दि.२२ (प्रतिनिधी )विद्यार्थ्यांच्या क्षमता शालेय जीवनातच ओळखून त्यांना योग्य मार्गदर्शन केले तर ग्रामीण भागातून देखील गुणवंत व दर्जेदार खेळाडू तयार होतील आणि असे खेळाडू तयार करण्याचे काम हेरिटेज क्रीडा महोत्सवातून नक्की घडेल असा विश्वास इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक उदयसिंह गायकवाड यांनी तालुक्यातील जावडे येथे व्यक्त केला
   हेरिटेज कल्चर आर्ट अँड एज्युकेशन डेव्हलपमेंट सोसायटी च्या जावडे येथील हेरिटेज प्रयोग भूमीमध्ये हेरिटेज क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या क्रीडा महोत्सवाची क्रीडा ज्योत प्रज्वलित करून स्पर्धेचे उद्घाटन उदयसिंह गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते यावेळी वरिष्ठ अधिकारी अपूर्वा कारंडे , संस्थेचे संस्थापक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष कांबळे, संस्थेच्या अध्यक्षा ॲड. अपर्णा पवार ,जावडे ग्रामपंचायतचे उपसरपंच सूर्यकांत नामे, विश्वस्त आर्यवर्धन कांबळे, दलित सेवा संस्थेचे अध्यक्ष वैभव यादव, माध्यमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक गजानन पांचाळ, न्यू इंग्लिश स्कूल जावडेचे मुख्याध्यापक संदेश कांबळे, प्राथमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मण मिडगुळे, जावडे ग्रामपंचायतीचे कर्मचारी श्रीकृष्ण शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
   संस्थे अतर्गत येणाऱ्या तीनही शाळांचा एकत्रित वार्षिक हेरिटेज क्रीडा महोत्सव शुक्रवार दि.१९ व शनिवार दि.२० डिसेंबर रोजी हेरिटेज प्रयोगभूमी जावडे येथे घेण्यात आला. यावेळी इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या अधिकारी अपूर्वा कारंडे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, क्रीडा क्षेत्रात देखील करिअर ल चांगली संधी आहे मात्र याच वयात अभ्यासाबरोबर सतत सराव करताना ध्येय निश्चित करून प्रयत्न केले तर जीवनात यशस्वी होता येईल. त्यासाठी अशा शालेय क्रीडा स्पर्धा आपल्याला दिशा देत असतात मात्र आपण त्यात सहभागी होऊन आनंद घेतला पाहिजे आणि यश – अपयश यांनी हुरळून न जाता सतत प्रयत्न केले पाहिजे असे प्रतिपादन देखील त्यांनी यावेळी केले.
या क्रीडा महोत्सवात कबड्डी, खोखो, हॉलिबॉल आदी सांघिक व विविध वैयक्तिक क्रीडा प्रकार घेण्यात आले. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेत सहभाग घेतला. या स्पर्धेचे नियोजन क्रीडा शिक्षक अमोल पवार व विद्धेश फणसे यांनी केले. यावेळी पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

spot_img

International

RELATED ARTICLES