Saturday, March 14, 2026

National

आई वडिलांचे आशीर्वाद हेच जगातील सर्वश्रेष्ठ आशीर्वाद व संपत्ती आहे – पोलीस अधिक्षक नितीन बगाटे

लांजा दि.०२ ( संदेश कांबळे) आई वडिलांचे आशीर्वाद हेच जगातील सर्वश्रेष्ठ आशीर्वाद आणि संपत्ती आहे मात्र आपल्याला जन्म दिलेल्या आई-वडिलांना व्यस्त कामामुळे भेटता येत नाही याची मनाला हुर हूर लागत होती. रत्नागिरी जिल्ह्यात मिशन जीवन अंतर्गत विविध उपक्रमा मार्फत मला माझ्या या आई-वडिलांना भेटण्याचे आणि गप्पा मारण्याची संधी प्राप्त झाली. त्यामुळे मी स्वतःला भाग्यशाली समजतो असे मत जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी व्यक्त केले. जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या संकल्पनेतून जिल्हाभरात मिशन जीवन अंतर्गत ज्येष्ठ नागरिकां ंचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. या अंतर्गत लांजा पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील वेरळ येथील मराठी शाळेत दिमागदार सोहळा पार पडला यावेळी बगाटे बोलत होते .यावेळी व्यासपीठावर अप्पर पोलीस अधीक्षक महामुनी, तहसीलदार प्रियांका ढोले ,उपविभागीय अधिकारी सुरेश कदम, गटशिक्षणाधिकारी विनोद सावंग ,विस्तार अधिकारी चंद्रकांत पावसकर पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे ,सरपंच सुवर्णा जाधव आदींसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्येष्ठ नागरिकांचे नातवंडांच्या हस्ते पाद्यपूजन करण्यात आले त्यानंतर एकाच वेळी सुमारे १२५ ज्येष्ठ नागरिकांचा भव्य केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला .यावेळी बोलताना श्री बगाटे म्हणाले की आपण हा उपक्रम जोरदार उत्साहात करून जेष्ठ नागरिकांची सुसंवाद साधला आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी हेल्पलाइन सुरू करण्यात आली असून आजी आजोबा आणि नातवंडे यांच्यातील दुरावा कमी करण्याचा या मिशनद्वारे प्रयत्न आहे. पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी लांजा तालुक्यात १६९२ ज्येष्ठ नागरिकांचा एकाच वेळी सन्मान सोहळा विविध ठिकाणी पार पाडून आपल्या कामातील चुणूक दाखवली आहे असे गौरव दगार काढले.

कार्यक्रमात अप्पर पोलीस अधीक्षक महामुनी तहसीलदार प्रियांका ढोले यांनी मार्गदर्शन केले . यावेळी पाच ज्येष्ठ नागरिक जोडप्यांचा तर वर्षाच्या पहिल्या दिवशी जेवढ्या ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस आहे त्यांचा सत्कार शाल श्रीफळ आणि प्रशस्तीपत्र देऊन करण्यात आला.
यावेळी या कार्यक्रमाला माजी पंचायत समिती सभापती दीपाली साळवी , मुख्याध्यापक संदीप कदम, पोलीस पाटील यदुनाथ पंडित, महेश गजबार , सना मुल्ला, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे आजोबा आणि नातंवंडे यांच्यातील सुसंवाद खूपच कमी झाला आहे. हा सुसंवाद वाढविण्यासाठी आजचा आयोजित केलेला हा कार्यक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला आहे .

spot_img

International

RELATED ARTICLES