लांजा दि.०६( प्रतिनिधी)राजापूर लांजा साखरपा विधानसभा मतदार संघाचे आमदार किरण सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त अन्न दान श्रेष्ठ दान या उक्तीप्रमाणे अष्टविनायक कन्स्ट्रक्शन लांजा यांच्या वतीने तालुक्यातील जनतेला बुधवार दि.७ जानेवारी रोजी मोफत अल्पोपहार ( नास्ता ) याचे वाटप करण्यात येणार आहे.
आमदार किरण सामंत यांचे समर्थक म्हणून एक वेगळी ओळख निर्माण करणारे उद्योजक रामदास खानविलकर हे नेहमीच सर्वसामान्य जनतेच्या सुख दुःखात सहभागी होत असतात. एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ओळख असणारे रामदास खानविलकर यांनी अन्न दान करीत आमदार किरण सामंत यांचा वाढदिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्धार केला असून त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत लांजा तहसील कार्यालयासमोर मोफत अल्पोपहार ( नास्ता ) याचे वाटप करण्यात येणार असून तालुक्यातील जनतेने याचा लाभ घेण्याचे आवाहन रामदास खानविलकर यांनी केले आहे.

