Thursday, March 19, 2026

National

दिव्यात वंचित बहुजन आघाडीकडून घरोघरी पोहचण्यासाठी निवडणूक चिन्ह असलेल्या सिलेंडर गुलकचे वाटप

दिवा –  ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जनतेशी थेट संवाद साधणारा एक अभिनव उपक्रम राबविण्यात आला. वाढती महागाई, गॅस दरवाढ आणि सामान्य कुटुंबांवरील आर्थिक ताण याकडे लक्ष वेधण्यासाठी पक्षाच्या निवडणूक चिन्ह असलेले सिलेंडर स्वरूपाचे गुलक नागरिकांमध्ये वाटप करण्यात आले.

हा उपक्रम केवळ प्रचारापुरता मर्यादित नसून, घराघरात जाणारा सामाजिक–आर्थिक वास्तवाचा संदेश देणारा ठरला आहे. स्वयंपाकघरातील सिलेंडर हा प्रत्येक कुटुंबाच्या जीवनाशी जोडलेला विषय असल्याने महिलांमध्ये या उपक्रमाबाबत विशेष चर्चा व सकारात्मक प्रतिसाद पाहायला मिळाला.

प्रभाग क्रमांक २७ व २८ मधील नागरिकांनी या वेगळ्या आणि आशयपूर्ण प्रचार पद्धतीचे स्वागत केले. सत्ताधाऱ्यांच्या जनविरोधी धोरणांमुळे निर्माण झालेल्या महागाईविरोधात जनजागृती करणे व सामान्य माणसाच्या प्रश्नांना केंद्रस्थानी आणणे, हाच या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

spot_img

International

RELATED ARTICLES