लांजा दि.२३( प्रतिनिधी )शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचारच मराठी माणूस आणि महाराष्ट्राचे रक्षण करू शकतात आणि ते विचार पुढे घेऊन जाण्याचे सामर्थ्य फक्त पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्याकडेच आहे त्यामुळेच शिवसेनाप्रमुखांच्या विचाराप्रती आपली निष्ठा कायम असली पाहिजे असे स्पष्ट प्रतिपादन शिवसेनेचे लांजा तालुका संपर्क प्रमुख जगदीश जुलूम यांनी शिवसेना लांजा तालुका कार्यालय येथे केले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्म शताब्दी निमित्त शिवसेना लांजा तालुका कार्यालय लांजा येथे आज बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले यावेळी संपर्क प्रमुख जगदीश जुलूम बोलत होते. यावेळी लांजा तालुका प्रमुख सुरेश करंबळे, महिला तालुका संघटिका पूर्वा मुळे, लांजा शहरप्रमुख मोहन तोडकरी, जेष्ठ शिवसैनिक सचिन लिंगायत, बाबा धावणे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी जगदीश जुलूम यांनी शिंदे गट व भाजप वर देखील टीका केली त्यांनी सांगितले की खोटी आश्वासने देऊन व मशीन मध्ये अफरातफर करून निवडणुका जिंकता येतील पण निष्ठा कुणालाही विकत घेता येणार नाही.
आज जे शिवसैनिक पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या सोबत आहेत तेच खरे निष्ठावंत असून आणि जे सोडून गेले ते पैशासाठी लाचार होते मात्र भयभीत होण्याचे कारण नाही शिवसेना प्रमुखांच्या आणि आई भवानीच्या आशिर्वादाने या महाराष्ट्रात पुन्हा एकदा शिवसेनेचे वादळ घोंगावल्याशिवाय राहणार नाही आणि त्याची सुरुवात आता होत असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत नक्की दिसेल व या होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकेल असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी तालुक्यातील बहुसंख्य शिवसैनिक उपस्थित होते.

