Tuesday, March 31, 2026

National

भांबेड जिल्हा परिषद गटातील  (उबाठा) सदस्यांचे देव धावबाला साकडे

लांजा दि.२५(  प्रतिनिधी)तालुक्यातील भांबेड जिल्हा परिषद गटातील शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांनी सालपे येथील जागृत देवस्थान असलेल्या श्री देव धावबा चे दर्शन घेत विजयासाठी साकडे घातले असून सालपे विभागातून शिवसेनेच्या उमेदवारांना वाढता पाठिंबा मिळत आहे.
   तालुक्यातील भांबेड जिल्हा परिषद गटातील शिवसेनेच्या उमेदवार अचला विश्वासराव तसेच भांबेड पंचायत समिती गणाचे उमेदवार युवराज हांदे व प्रभानवल्ली गणाचे राजेंद्र घडशी यांनी सालपे येथील जागृत देवस्थान म्हणून ओळख असलेल्या श्री देव धाववाचे दर्शन घेत यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षाची सत्ता जिल्हा परिषद रत्नागिरी व पंचायत समिती लांजावर येऊन या दोन्ही उमेदवारांना विजयी करावे असे साकडे घातले यावेळी सालपे गावातील बहुसंख्य शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते.

भांबेड जिल्हा परिषद गटातून शिवसेनेच्या महिला उपजिल्हा संघटक उल्का विश्वासराव यांच्या कन्या अचला हरिश्चंद्र विश्वासराव तसेच भांबेड पंचायत समिती गणातून लांजा पंचायत समितीचे माजी सभापती युवराज हांदे यांना पुन्हा संधी दिली आहे तर प्रभानवली पंचायत समिती गणातून कोल्हेवाडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच राजेंद्र घडशी यांना सदस्य पदासाठी शिवसेनेने उमेदवारी दिली आहे या तिन्ही उमेदवारांना भांबेड जिल्हा परिषद गटातून जनतेतून मोठा प्रतिसाद मिळत असून यांच्या विजयाची खात्री शिवसैनिक व्यक्त करीत आहेत.

spot_img

International

RELATED ARTICLES