Tuesday, March 3, 2026

National

19 फेब्रुवारी रोजी दिवा शहरात छत्रपती शिवाजी महाराज शिवजयंती धुमधडाक्यात साजरी होणार

दिवा (प्रतिनिधी) अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती 19 फेब्रुवारी रोजी दिवा शहरातील विविध संघटनांकडून धुमधडाक्यात साजरी करण्यात येणार असून त्याची जय्यत तयारी सुरु असल्याची माहीती मिळत आहे.यावर्षी छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव मंच-दिवा शहर यांच्याकडून विशेष कार्यक्रमांचे आयोजन  करण्यात आले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज अखंड हिंदुस्थानचे दैवत असून शिवजयंतीला दिवा शहरात संपुर्ण वातावरण शिवमय होत असल्याचे आतापर्यंत दिसून आले आहे.यावर्षी छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव मंच-दिवातर्फे भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.शिवजयंतीचा कार्यक्रम 19 फेब्रुवारी रोजी ग्लोबल मैदान येथे साजरा करण्यात येणार आहे.यावेळी सकाळी 10 वाजता शिवप्रतिमेचे पूजन,सकाळी 10.15 वाजता शिवज्योतीचे आगमन होणार आहे.स.11 ते 12 वाजण्याच्या दरम्यान प्रभास कराटे स्पोर्टस अँकेडमी यांचे कराटे,नंतर सुस्वर भजन,श्री साईनात प्रासादिक भजन मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे.दुपारी 3 ते 4 वाजता श्री देव स्थानेश्वर गांगेश्वर प्रासादिक भजन(बुवा-प्रथमेश पं.घाडीगांवकर) सायं.4 ते 5 वाजता शिवशंभो आखाडा कल्याण,धनगर गज नृत्य,वक्रतुंड म्युझिकल गृप (दिवा डोंबिवली),विविध सांस्कृतिक कार्यक्रम,आलेल्या मान्यवरांचा सत्कार,तसेच जय जय महाराष्ट्र माझा गीत सादर करण्यात येणार आहे.

उत्सव भारताचा..सोहळा बहुजणांचा…अभिमान दिवा शहराचा या उक्तीखाली दिवा शहरातील अनेक बांधव शिवजयंती उत्सवात सहभागी होतात.शिवाय दिवा शहरातील इतर विविध संघटनाही भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करुन शिवजयंती उत्सव मोठ्या थाटामाटत साजरा करतात. यावर्षी दिवा शहरातील वातावरण मात्र शिवमय झाल्याचे आपणांस पहायला मिळणार आहे.

spot_img

International

RELATED ARTICLES