दिवा प्रभाग समितीकडून कारवाईकडे दुर्लक्ष
ठाणे (प्रतिनिधी) रस्त्यांच्या दुतर्फा बसलेली अनधिकृत फेरिवाले आणि दुतर्फा लागलेल्या दुचाकींच्या पार्कींमुळे शीळफाटा ते महापे रोड परिसर व्यापला असून वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाल्याचे चित्र आहे.याबाबत दुश्य व्हायरल होत असतानाही दिवा प्रभागसमितीकडून या वाहनांवर कोणतेही नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे.अश्या परिस्थितीमुळे फुटपाथ,पायी चालणाऱ्या नागरिकांना अपघातासारख्या परिस्थितीला सामोरे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शीळफाटा परिसरातील वाहतुक कोंडी लक्षात घेता शीळफाटा ते महापे रोड,शीळफाटा ते दिवा फुटपाथ तसेच सिबलीनगर परिसरात रस्त्याच्या दोन्ही बाजूला लावण्यात येणाऱ्या दुचाकींनी या विभागातील वाहतुक कोंडीस हातभार लावल्याचेच दिसून येत आहेत.येथील रस्त्यांच्या बाजूला हजारो दुकाची अनधिकृतपणे पार्कींग केल्या जात आहेत.त्यामुळे वाहनांना मोठा अडथळा निर्माण झाला आहे.तसेच येथून चालणाऱ्या नागरिकांनाही मोठ्या अपघाताला सामोरे जाण्याची शक्यता आहे.
रस्त्याच्या बाजूला लागलेल्या वाहनांमुळ् अडथळा होत असल्याचे दिसून येत असतानाही ठाणे महानगरपालिकेच्या दिवा प्रभाग समितीकडून कोणतीही कारवाई केल्याचे निदर्शनास येत नसल्याचे चित्र आहे.दिवा प्रभाग समितीने या गाड्यांना हटविल्यास येणारे जाणारे रस्ते मोकळे होऊ शकतात,तसेच नागरिकांनी चालणे सुलभ होईल मात्र यागोष्टीकडे दुर्लक्ष केल्याने भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.

