तळा-रायगड :- कोकणातील पारंपरिक शक्ती तुरा (जाखडी) शाहिरी परंपरेचे ज्येष्ठ शाहीर तथा जाखडी कलेला महाराष्ट्रासह देश-विदेशात पोहोचवणारे शाहीर रामचंद्र हरि घाणेकर (बुवा) यांचे सोमवारी त्यांच्या मूळ गावी पढवण ता. तळा जि. रायगड येथे राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या निधनाने शक्ती तुरा आणि शाहिरी क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
कोकणातील गौरी-गणपती उत्सवात रंगत आणणाऱ्या जाखडी नृत्याला मानाचे स्थान मिळवून देण्यात घाणेकर बुवा यांचे मोठे योगदान होते. शक्ती तुरा परंपरेतील त्यांचा दमदार आणि पहाडी आवाज रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत होता. जाखडी कला कॅसेटच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आणि परदेशातील कोकणी रसिकांपर्यंत पोहोचविण्याचे श्रेयही त्यांनाच दिले जाते. त्यामुळे त्यांना “पहिले कॅसेट किंग” म्हणूनही ओळखले जात होते.
शक्ती तुरा शाहिरी परंपरेचे खंदे शिलेदार म्हणून त्यांनी अनेक दशके या लोककलेची सेवा केली. त्यांच्या निधनाने शाहिरी क्षेत्रातील एक तेजस्वी तारा हरपल्याची भावना कलाकार आणि रसिक व्यक्त करत आहेत. त्यांच्या जाण्याने शक्ती तुरा परंपरेची कधीही भरून न निघणारी हानी झाल्याची प्रतिक्रिया या क्षेत्रातून उमटत आहे.
त्यांच्या पार्थिवावर आज (दि. २१) दुपारी २ वाजता त्यांच्या मूळ गावी पढवण येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.
शक्ती तुऱ्यातील पहाडी आवाज हरपला; शाहीर रामचंद्र घाणेकर यांचे निधन