मुंबई(प्रतिनिधी) :- राज्यातील २४७ नगर परिषदा व ४२ नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
राज्य निवडणूक आयोगाने दि.२१/०८/२०२५ च्या अधिसूचनेन्वये दिनांक ०१/०७/२०२५ ही तारीख जाहीर केली असून, त्या दिवशी (म्हणजेच दि.०१/०७/२०२५ रोजी) अस्तित्वात असलेली महाराष्ट्र विधानसभेची मतदार यादी या सार्वत्रिक निवडणुकां साठी वापरण्यात येईल. या मतदार यादीच्या आधारे प्रभागनिहाय मतदारांचे विभाजन करण्याची कार्यवाही करण्यात यावी. याकरिता राज्य निवडणूक आयोगाचे आदेश क्र. रानिआ/ग्रापंनि-२०२३/प्र.क्र.०३ का-८, दि.१६/०७/२०२५ मध्ये दिलेल्या सूचनांनुसार कार्यवाही करावी.
मतदार यादी ग्राह्य धरुन उपरोक्त नगरपरिषदा / नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम खालील प्रमाणे राहील :-
प्रभाग निहाय प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करणे – दि. ०८/१०/२०२५
प्रारुप मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी – दि. ०८/१०/२०२५ ते १३/१०/२०२५
अंतिम प्रभागनिहाय मतदार याद्या अधिप्रमाणित करुन प्रसिध्द करणे – दि. २८/१०/२०२५ मतदान केंद्रांची यादी प्रसिध्द करणे- दि. ०७/११/२०२५ असा कार्यक्रम जाहीर केला आहे.

