दिवा (प्रतिनिधी) महीलांच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेता दिवा पोलीस चौकीत महीला पोलीस कर्मचा-यांची संख्या अत्यंत आवश्यकता असताना ठाणे पोलीस प्रशासनाकडून दिरंगाई होत आहे.यासाठी दिवा भाजपा महीला मोर्चाच्या अध्यक्षा सौ.सपनाताई भगत यांनी भारतीय जनता पार्टी ठाणे जिल्हा अध्यक्ष संदीपची लेले यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांची भेट घेऊन दिवा पोलिस चौकीला महिला पोलीस अधिकारी नियुक्त करावी अशी मागणी केली आहे.
या आधीही भारतीय जनता पार्टी दिवा शहर महिला मोर्चाच्या वतीने दिवा पोलिस चौकीत महिला पोलिस कर्मचारी नेमणुक करावी अशी मागणी करून पोलिस प्रशासनाला निवेदन पत्र देखील दिले होते .या पत्राची दखल घेवून दिवा पोलिस चौकीला महिला पोलीस अधिकारी नियुक्त केल्या होत्या.मात्र दिवा पोलिस चौकी या महीला पोलीस कर्मचा-यांना बसण्यासाठी आसनांची व्यवस्था नसल्याने काही महिन्यांनी मुंब्रा पोलिस स्टेशनला पाठवण्यात आल आहे. दरम्यान महीला्वरील होणारे अत्याचार लक्षात घेता दिवा शहरात महीला पोलीसांची नियुक्ती करणे गरजेचे आहे.यासाठी सौ.सपनाताई रोशन भगत यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेवून दिवा पोलीस चौकीसाठी महिलाअधिकारी , आणि कर्मचारी यांची तत्काळ पुन्हा एकदा नियुक्ती करा असे निवेदन दिले.
यावेळी भारतीय जनता पार्टी ठाणे जिल्हा अध्यक्ष संदीप लेले , दिवा मंडळ अध्यक्ष सचिन भोईर, ठाणे जिल्हा चिटणीस विजय भोईर ,ठाणेजिल्हा कार्यकारणी सदस्य,गणेश भगत ठाणे जिल्हा कार्यकारणी सदस्य रोशन भगत , मंडळ सरचिटणीस समीर चव्हाण,ओबीसी मोर्चा अध्यक्ष श्रीधर पाटील , व्यापारी सेल अध्यक्ष जयदीप भोईर, मंडल उपाध्यक्ष अशोक गुप्ता, सोशल मीडिया प्रमुख राहुल शाहू ,महिला मोर्चा सरचिटणीस प्रयांका माड भगत आदी पदाधिकारी उपस्थित होते.

