Thursday, November 13, 2025

National

डी. बी. जे. महाविद्यालयाला मुंबई विद्यापीठाचे सुवर्णपदक

मुंबई (प्रतिनिधी): मुंबई विद्यापीठ आयोजित ५८ व्या युथ फेस्टिवल स्पर्धेत चिपळूणच्या डि. बी. जे. महाविद्यालयाने अभिमानास्पद यश मिळवले आहे. पारंपरिक लोक वाद्यवृंद (Folk Orchestra) या प्रकारात महाविद्यालयाने गोल्ड मेडल पटकावले.

मुंबई फोर्ट येथे विद्यापीठाच्या इमारतीत झालेल्या या सोहळ्यात एकूण १५ महाविद्यालयांनी सहभाग नोंदवला होता. त्यात डि.बी.जे. महाविद्यालयाच्या अथर्व भेकरे, सम्यक जाधव, संस्कार लोहार, रितेश सुतार, सुदेश सुतार, विनायक शिर्के, श्रीराम देवळेकर, साहिल म्हस्के आणि सोनाली कदम यांनी सादर केलेल्या पारंपरिक वाद्यांच्या अप्रतिम सादरीकरणाला परीक्षकांनी सर्वोच्च स्थान बहाल केले.

या वाद्यवृंदाला रुपेश धाडवे यांच्यासह मानस साखरपेकर, संकेत नवरथ, सुजल लोहार आणि इतरांनी मार्गदर्शन केले. या यशामुळे रत्नागिरी जिल्ह्याचे व विशेषत: डी. बी. जे. महाविद्यालयाचे नाव पुन्हा एकदा उज्ज्वल झाले आहे.

spot_img

International

RELATED ARTICLES