दिवा l भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा सौ सपना रोशन भगत आणि भाजपा दिवा शहर आयोजित दिवाळी निमित्त घेतलेल्या भव्य गड किल्ले बांधणी स्पर्धेत तिसाई मित्रमंडळ गणेशपाडा यांनी प्रथम क्रमांक पटकावला असून द्वितीय क्रमांक शिवबा राज प्रतिष्ठान बेडेकर नगर आणि अचानक मित्रमंडळ साबेगाव यांनी पटकविला आहे.
दिव्यातील ग्लोबल स्कूल मैदानावर शिवप्रेमींच्या आणि दिव्यातील तमाम जनतेच्या प्रचंड उपस्थित सदरचा बक्षिस समारंभ मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडला. प्रथम क्रमांक पटकाविलेल्या तिसाई मित्र मंडळ गणेश पाडा यांनी किल्ले बांधणी करताना अंकाई टंकाईची हुबेहुब प्रतिकृती साकारली होती. द्वितीय क्रमांक पटकाविलेल्या शिवबा राज प्रतिष्ठान बेडेकर नगर यांनी सिंहगड किल्ल्याचे दर्शन घडविले आणि अचानक मित्र मंडळ साबेगाव यांनी विसापूर कठीणगड किल्ला तयार केला .तसेच तृतीय क्रमांक पटकाविलेल्या क्षत्रिय कुलावंतस प्रतिष्ठान साईबाबा मंदिर आगासन यांनी प्रतापगड आणि नव तरुण मित्र मंडळ बेडेकर नगर यांनीही प्रतापगड किल्ला बनविला होता. तसेच चतुर्थ क्रमांक विभागून गडप्रेमी ग्रुप वक्रतुंड नगर यांनी तोरणा किल्ला तर काळुबाई बाळ मित्र मंडळ म्हात्रे गेट यांनी रायगड किल्ला बनविला होता.
पाचवा क्रमांकही विभागून देण्यात आला.शिवप्रेरणा ग्रुप नाईक नगर यांनी अजिंक्यतारा तर गावदेवी चाळ बेडेकर नगर यांनी राजगड किल्ला बनविला होता.
भव्य दिव्य बक्षिस समारंभाला ठाणे जिल्हा माजी अध्यक्ष संजय वाघुले,माजी ठाणे जिल्हा सरचिटणीस मनोहर मनोहर सुखदरे, विक्रम भोईर, ,भाजपा ठाणे जिल्हा उपाध्यक्ष विजय भोईर,भाजपा दिवा मंडळ अध्यक्ष सचिन भोईर, दिलीप भोईर,अंकुश मढवी,रेश्मा पवार, नरेश पवार,जयदीप भोईर, श्रीधर पाटील,समीर चव्हाण,अनुराज पाटील, जिलाजीत तिवारी,अशोक गुप्ता,नितीन कोरगांवकर, प्रकाश पाटील, विठ्ठल गावडे, रवी मुणंनकर ,किरण कोरगांवकर, सुदेश पाटील,अनिल गावकर,अनंत पडेलकर,स्वप्नील धुमाळ,राकेश मिश्रा,विशाल गुप्ता आणि भाजपा महिला मोर्चाची संपूर्ण टीम आदि उपस्थित होते.
या दिव्य समारंभाचे सूत्रसंचाल सुप्रसिध्द निवेदिका करुणा सचिन गगे बांगर यांनी आपल्या सुमधुर आणि भारदस्त आवाजाने कार्यक्रमाला एक वेगळ्याच उंचीवर नेले


