Friday, January 23, 2026

National

दिव्यात ‘भाजपा’ स्वबळावर लढणार, भाजप पदाधिकाऱ्यांनी पोस्टर केले व्हायरल

दिवा (सचिन ठिक) दिवा शहरात महायुतीत धूसफुस सुरु असून महायुतीच्या चिन्हावर लढण्याची शक्यता कमी प्रमाणात वर्तवली जात आहे. सोशल मिडीयावर नुकताच याबाबत भाजप पदाधिकाऱ्यांकडून पोस्टर व्हायरल करण्यात आले असून यावेळी ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत दिवा भाजपा ‘कमळ’ या चिन्हावर स्वतंत्र लढणार असल्याचे सांगण्यात आले आहे.यामुळे एकंदरीत वातावरण पाहता दिव्यात दोन पक्षात मोठी टक्कर पहायला मिळणार आहे.

दिवा शहरात पाहीले तर गेल्या पाच वर्षापूर्वी ठाणे महानगरपालिकेत शिवसेना या एकमेव पक्षाचे उमेदवार मोठ्या संख्येने निवडुण आले होते.त्यावेळी शिवसेना हा पक्ष संपुर्ण होता.परंतु पाच वर्षापूर्वी या पक्षाची विभागणी झाल्यामुळे शिवसेना या पक्षाचे दोन गट म्हणजे शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब गट झाले.यात बऱ्यापैकी माजी नगरसेवकांचे म्हणजेच निवडुण आलेले पुर्वीचे आणि आत्ताचे माजी नगरसेवक हे शिंदे गटाकडे गेले.पैकी एकच माजी नगरसेविका शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाकडे आहे.त्यामुळे पाच वर्षानंतर जास्त माजी नगरसेवक ज्या गटाकडे गेलेत त्या गटालाचा विजयाचे प्रबल दावेदार मानले जात आहे.

मात्र, दरम्यानच्या काळात केंद्रात आणि राज्यात मोठा सत्ता बदल झालेला आहे.राज्यात ना शिवसेना,ना काँग्रेसची सत्ता राहीली आहे.या पार्श्वभुमीवर ज्याची केंद्रात आणि राज्यात सत्ता आहे, त्याच अनुषंगाने दिवा शहरातही भाजपाला सत्तेत सामील व्हायचे आहे.केंद्रात आणि राज्यात सत्ता असल्यामुळे दिवेकर नागरिकांचा त्याचा मोठा फायदा होईल असे दिवा शिळ मंडळ अध्यक्ष श्री सचिन भोईर यांना वाटू लागले आहे.दिव्यात सध्या भाजपाचा एकही सदस्य निवडून गेलेला नाही. दिव्यात भारतीय जनता पक्षाचे मतदार शिंदे गटाच्या तुलनेत बरोबरीच्या क्षमतेने आहेत.भाजपाकडे उत्तरभारतीय,मराठी,परप्रांतिय आणि स्थानिक मतदारही आहेत.मात्र शिंदे गटाकडे त्यांचे पुर्वीचे परंपरागत मतदार आहेत.

दिवा शहर सध्या शिंद गटाकडे एकतर्फी असल्याचे बोलले जात आहे.बदलत्या राजकारणात पुढे काय होईल हे काळच सांगणार आहे.मात्र  केंद्र् आणि राज्यातील देंवेंद्र फडणवीस सरकार असल्यामुळे दिव्यातही बदल होऊ शकतो असे वर्तविण्यात येत आहे.याच आत्मविश्वासावर सध्या दिवा भाजपा शीळ मंडळ अध्यक्ष श्री सचिन भोईर यांनी ठाणे महानगरपालिकेची निवडणुक स्वबळावरच लढविणार असल्याचा नारा दिला आहे.

spot_img

International

RELATED ARTICLES