Saturday, November 15, 2025

National

ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांना २४५०० रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे महापालिका आयुक्तांना निर्देश

ठाणे  : यावर्षी दिवाळी सणाच्या निमित्ताने ठाणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना २४५०० रुपये इतके सानुग्रह अनुदान देण्याचे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांना दिले आहेत. या निर्णयामुळे महापालिकेच्या ९२२१ कर्मचाऱ्यांची दिवाळी आनंदात जाणार असून सर्व कर्मचाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत.

 गेल्यावर्षी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी दिवाळीच्या निमित्ताने २४००० रूपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात आले होते. यावर्षी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार सन २०२५ साठी महापालिका कर्मचाऱ्यांना २४५०० रुपयांचे सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आले आहे. हे सानुग्रह अनुदान कर्मचाऱ्यांच्या खात्यात तत्काळ जमा करण्यात येणार आहेत. कर्मचाऱ्यांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी, यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सानुग्रह अनुदानाचा निर्णय घेतला आहे.

महापालिकेचे कर्मचारी वर्षभर सर्व यंत्रणा सुरळीत सुरू रहावी यासाठी कार्यरत असतात. त्यांच्या सणाच्या आनंदात भर म्हणून हा सानुग्रह अनुदानाचा निर्णय घेण्यात आला आहे. सानुग्रह अनुदान जाहीर झाल्यामुळे महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

 ठाणे महापालिकेचे ६०५९ कर्मचारी, शिक्षण विभागाचे ७७४ कर्मचारी, परिवहन विभागाचे १४०० कायम कर्मचारी, महापालिकेचे थेट कंत्राटी कर्मचारी व इतर असे ९८८ कर्मचारी यांना सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे, ठाणे महापालिकेवर सानुग्रह अनुदानापोटी सुमारे २३ कोटी इतके अतिरिक्त दायित्व येणार आहे.

spot_img

International

RELATED ARTICLES