दिवा (प्रतिनिधी) दिवा प्रभाग समिती कार्यालयीन उपअधिक्षक असलेले आणि भांडणे (पि) गावचे नागरीक कै.सुदाम मंगाजी गायकवाड यांचे ५ ऑक्टोबर २०२५ रोजी कल्याण येथे आकस्मिक निधन झाले आहे.त्यांच्या निधनाची बातमी कळताच दिवा परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
कै.सुदाम गायकवाड हे माजीवडा प्रभाग समितीमध्ये अनेक वर्षे कार्यरत होते.तद्नंतर तीन महीन्यापुर्वी त्यांची दिवा प्रभाग समितीमध्ये बदली करण्यात आली होती.येथे काम करताना त्यांचा अत्यंत शांत स्वभाव असायचा.कोणतेही काम वेळे पुर्ण करण्यासाठी ते प्रयत्नशील असायचे.त्यांच्या शांत स्वभावामुळे अनेक माणसे जोडून ठेवली होती.त्यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे सर्वत्र शोक व्यक्त करण्यात येत आहे.

