Tuesday, December 9, 2025

National

“छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स” अश्या संपुर्ण उद्घोषणेसाठी कोकण प्रवासी रेल्वे संघटनेचे वरिष्ठ प्रबंधकांना निवेदन

मुंबई (प्रतिनिधी)  कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघ (रजि) ठाणे यांच्यावतीने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संपूर्ण नावाची मुंबईहून/मुंबईकडे येणाऱ्या-जाणाऱ्या रेल्वे स्थानकात ऊद्घोषणा आणि लांब पल्लयाच्या गाडीवर “छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स” मुंबई या प्रकारे संपुर्ण नावाची उद्घोषणा व्हावी या मागणीसाठी कोकण प्रवासी रेल्वे संघटनेची वरिष्ठ प्रबंधकांची घेतली भेट आहे.

महाराजांच्या नावाच्या अस्तित्वासाठी लढा देण्यासाठी कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघाच्या शिष्टमंडळाने गुरूवारी दिनांक २० नोव्हेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स रेल्वे स्थानक मुंबई येथील वरिष्ठ वाणिज्य मंडळाचे मुख्य विभागीय वाणिज्य प्रबंधक अधिकारी श्री. प्रवीण वंजारी यांची भेट घेतली.तसेच मागणीबद्दल निवेदन दिले. यावेळी उद्घोषणेच्या संपुर्ण नावाबद्दल सविस्तर चर्चा करण्यात आली.

मुख्य विभागीय वाणिज्य प्रबंधक अधिकारी श्री. प्रवीण वंजारी यांनी येणाऱ्या ४५ ते ६० दिवसांमध्ये आम्ही या सर्व मागण्यांची पूर्तता नक्कीच करू तसेच संघटनेसही लेखी उत्तर देवू. असे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. यावेळी संदर्भातील निवेदन लोकप्रतिनिधी यांजकडे ही देण्यात आले. मा. मा. खा. श्री. संजीवजी नाईक साहेब, खा. श्री. नरेशजी मस्के, माजी खा.राजन विचारे, मनसे नेते अविनाश जाधव, आ. संजय केळकर आदी महोदयांनाही निवेदन देण्यात आले.

सदर निवेदन पत्रक देताना संघटनेचे प्रमुख सल्लागार श्री राजू कांबळे, सचिव श्री. दर्शन कासले, सल्लागार श्री. तुषार साळवी, सदस्य श्री. नामदेव चव्हाण, श्री. मिलिंद सावंत, श्री. हनुमंत निकम, श्री. साहिल सकपाळ, श्री. तुषार ताम्हणकर यांनी आवर्जून उपस्थिती दर्शविली.

spot_img

International

RELATED ARTICLES