दिवा ( प्रतिनिधी) ‘काम करत आलोय… काम करत राहु’ अशा शिवसेनेच्या ब्रिद वाक्याची गरीमा राखण्यासाठी काल रविवारी रोजी दिवा पूर्वेतील बी.आर.नगर येथील बिल्डिंग, चाळींमधील रहिवाशांना निवडणुकी पूर्वी दिलेल्या वचनांची पुर्ती करण्यासाठी नगरसेविका सौ. दिपाली भगत आणि शिवसेना,दिवा पूर्व विभागप्रमुख उमेश अशोक भगत यांनी आपल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह रहिवाशांच्या नागरी समस्या जाणून घेण्यासाठी विविध ठिकाणी भेट दिली. रहीवाश्यांना उद्भवणा-या रस्ता,गटर लाईन,पथ दिवे,मुबलक पाणी’ अशा अनेक समस्या सद्यस्थितीत काय आहेत आणि त्यावर काय उपाययोजना करायला हव्यात यासंबंधी प्रत्यक्षात नागरिकांशी संवाद साधून जाणून घेतल्या.
यावेळी रहिवाशांनी नगरसेविका सौ. दिपालीताई भगत आणि मा.उमेश भगत यांचे शाल,श्रीफळ देऊन स्वागत केले तर यावेळी महिलांनी मोठ्या आधाराने दिपालीताई भगत यांना ‘हळदि कुंकवाचा’ मान दिला.
प्रभाग क्रमांक 27 (क) मधील नागरीकांच्या सर्व नागरी समस्या येणा-या पावसाळ्या पूर्वीच सोडवू अशी ग्वाही सौ.दिपालीताई उमेश भगत आणि शिवसेना,दिवा पूर्व विभागप्रमुख उमेश अशोक भगत यांनी दिली.

