दिवा (प्रतिनिधी ) भारतीय जनता पार्टी ठाणे जिल्हाअध्यक्ष श्री संदिप लेले,महिला अध्यक्षा सौ.स्वप्नाली साळवी,दिवा शिळ मंडळ अध्यक्ष श्री सचिन भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली दिवा शहरातील बेतवडे गाव येथे महिलांसाठी आरोग्य शिबीर उत्साहात पार पडले. दिवा महिला मोर्चाच्या अध्यक्षा सौ.सपनाताई रोशन भगत यांच्या पुढाकाराने हे तिसरे शिबीर होते..आपल्या गावातील नागरिकांसाठी एक महिला एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रयत्न करीत असल्याचे पाहून नागरिकांना एक विश्वास निर्माण झाला आहे.
ठाणे महानगर पालिकेच्या आरोग्य सखी या योजनेंतर्गत हे आतापर्यंतचे तीसरे मोफत मेमोग्राफी शिबीर आहे.या शिबीरात ब्रेस्ट कॅन्सर आवरनेस आणि आयुष्यमान कार्डाचेही वितरण करण्यात आले.या शिबीरात अनेक महिलांनी लाभ घेतला.अनेक रुग्णांना तातडीची मदत मिळाली. तर काही रुग्णांना विशेष सल्ला देण्यात आला.उपनगरीय भागातील रुग्णांना अश्या प्रकारेची शिबीरे जणू आरोग्याला दिलासा देणारी ठिणगी ठरतात.महिलांचे आरोग्य सशक्त झाले तर परिवार सशक्त होतो.या अभियानाचा मुलभूत संदेश पोहचविण्यात हे शिबीर यशस्वी ठरले.
स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचे मनापासून स्वागत केले.सरकारी यंत्रणेतून अश्या पद्धतीने उपक्रम अधिक प्रमाणात राबविले गेले तर गावातील नागरिकांना शहराकडे धाव घ्यावी लागणार नाही.या उपक्रमामुळे आरोग्य सेवेचा लाभ घरपोच मिळत आहे.या शिबीरासाठी दिवा शीळ मंडळ अध्यक्ष श्री सचिन भोईर,श्री रोशन भगत,अंकुश मढवी,श्रीधर पाटील,जयदिप भोईर,अनुराज पाटील,प्रकाश पाटील,दिनेश जाधव,बेतवडे गावातील जगन्नाथ पाटील,कमलाकर तांडेल,जयंत पाटील,प्रवीण तांडेल,ह्रतिक भोईर,लक्ष्मण बुवा,ज्ञानेश्वर पाटील,त्याचबरोबर महिला मोर्चाच्या पदाधिकारी यादेखील उपस्थित होत्या.

