Wednesday, May 6, 2026

National

दिव्यात जनगणना प्रशिक्षणाला शिक्षकांची दांडी; दिवा सहाय्यक आयुक्तांची पोलीसांत तक्रार,गुन्हा दाखल

दिवा (सचिन ठिक) दिवा शहरात जनगणना कामासाठी नियुक्त करण्यात आलेल्या अनेक शाळांतील शिक्षक प्रशिक्षणाला गैरहजर राहत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. या प्रकरणाची दखल  प्रशासनाने घेतली असून ठाणे महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार दिवा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त तथा चार्ज अधिकारी शिवप्रसाद नागरगोजे यांनी कठोर पावले उचलली आहेत.

दिव्यातील ड्यू ड्रॉप स्कूल, ग्लोबल इंग्लिश स्कूल आणि साउथ इंडियन स्कूल येथील काही शिक्षकांनी शासकीय प्रशिक्षणाला अनुपस्थित राहून राष्ट्रीय कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच हे प्रकरण संबंधित शिक्षण विभागाकडेही पुढील कारवाईसाठी प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याची माहिती सहायक आयुक्त शिवप्रसाद नागरगोजे यांनी दिली.

दरम्यान, इतर काही शाळांतील शिक्षक देखील प्रशिक्षणाला गैरहजर राहत असल्याचे समोर आले असून त्यांच्याविरोधातही कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. काही शिक्षकांनी परीक्षा व शैक्षणिक कामकाजाचे कारण देत प्रशिक्षणास अनुपस्थिती दर्शवली आहे.

यामुळे घरोघरी जाऊन माहिती गोळा करण्याच्या (हाऊस-लिस्टिंग) प्रक्रियेत विलंब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

spot_img

International

RELATED ARTICLES